नाशिकमध्ये एसटी बसला भीषण अपघात; ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये एसटी बसला भीषण अपघात; ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

नाशिकमध्ये एसटी आणि कंटेनरला भीषण अपघात झाला आहे. देवळा तालुक्यातील देवळा- चांदवड राज्य महामार्गावर ही घटना घडली आहे. भावडबारी घाटामध्ये बसने कंटेनरला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ५ जण जागीच ठार झाले तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भावडबारी घाटामध्ये एसटी बसने कंटेनरला धडक दिली. एसटी बस नंदुरबार डेपोची असून ती नाशिककडे जात होती. हा अपघात ऐवढा भीषण होता की, अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाता दरम्यान चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहूल आहेर याच महामार्गावरुन देवळ्याकडे जात होते. त्यांनी अपघातातील जखमींना ताबतोब मदतकार्य करत रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

First Published on: September 4, 2018 2:35 PM
Exit mobile version