नागरिकत्व दुरुस्ती कायदा: मराठवाडा पेटला!

नागरिकत्व दुरुस्ती कायदा: मराठवाडा पेटला!

नागरिकत्व दुरुस्ती कायदा: मराठवाडा पेटला!

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील धग आता महाराष्ट्रात पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी ईशान्य भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम यांसारख्या सात राज्यांमध्ये आंदोलनाच्या रुपात पेटलेली ही आग आता महाराष्ट्रातील मराठवाड्यात पोहोचली आहे. काल मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हजारो आंदोलक एकत्र आले होते. यामध्ये सिनेअभिनेतेही सामील झाले होते. मात्र, हे आंदोलन अत्यंत शांतपणे पार पडले. त्यामुळे काल रात्री प्रसारमाध्यमांनीही शांततेने केल्या गेलेल्या या आंदोलनाचे कौतुक केले होते.


हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायदा: ‘हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पप्रमाणे राज्यात डिटेन्शन कॅम्प’


आज मराठवाड्यातील बीड, नांदेड आणि परभमी जिल्ह्यांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून या तीनही राज्यांमध्ये शांतता पाळली गेली. काही संघटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आंदोलन करत निघाले. तिथे ते निदर्शने देणार होते आणि हा कायदा रद्द करावे, असे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देणार होते.


हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात दिल्लीतही हिंसक आंदोलन


मात्र, जे घडायला नको होते, तेच घडले. बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे काही जणांनी एसटी बसवर दगडफेक केली आणि शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. दगडफेक करणारे आंदोलक होते की समाजकंटक याबाबत माहिती समोर आली नाही. त्याचबरोबर या दगडफेकीत कुणी जखमी झाले आहे का? याबाबतही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जमुळे आंदोलक पांगले. त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली.


हेही वाचा – कितीही विरोध करा, कायदा बदलणार नाही – अमित शहा


बीड पाठोपाठ नांदेडमध्येही तसाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले. आंदोलकांनी नांदेड रेल्वे स्थानकाबाहेर एका बसची तोडफोड केली. तर परभरणीतही आंदोलकांनी अग्रनिशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कोणत्याही अफवांना बळी पडून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.

First Published on: December 20, 2019 5:32 PM
Exit mobile version