केंद्र सरकारने राज्याला कोरोना लसीकरण करण्यासाठी स्वायत्तता द्यावी – डॉ.सुभाष साळुंखे

केंद्र सरकारने राज्याला कोरोना लसीकरण करण्यासाठी स्वायत्तता द्यावी – डॉ.सुभाष साळुंखे

कोरोना लसीकरण

महाराष्ट्राचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार तसेच राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॅा.सुभाष साळुंखे यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात राज्याला स्वायत्तता देण्यात यावी असे वक्तव्य केलं आहे. राज्यामध्ये कोरोणाचा वाढता प्राभाव पाहता लसीकरणामघ्ये वाढ करण्यात यावी. तसेच जर महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढवल्यास लोकांना लसीकरण करणे अवघड होणार नाही असं म्हंटल आहे. याआधी सुद्धा डॉ. सुभाष साळुंखे यांनी १८ वर्षा पुढील लोकांना कोरोना लसीकरण देण्यात प्राधान्य देण्यात यावं आशी मागणी केली होती.

राज्यात मुंबई, नाशिक, पुणे या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशा जिल्हयांत रोज १ लाख लोकांसाठी लसीकरण करण्यात यावं तसेच वेग वाढवावा. काही दिवसांपुर्वी कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असे लोकांना वाटल्यामुळे लोकांनी काळजी घेणं बंद केल होत. या वाढत्या कोरोना महामारीस आपणच जबाबदार आहोत असं देखील डॅा. सुभाष साळुंखे यांनी म्हंटल आहे. दरम्यान लोकांकडून अनेकदा कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. लग्न समारंभ, अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना लोक मोठ्या संख्येने हजेरी लावू लागले. लोकांतर्फेच नाही तर अनेक नेत्यांकडून देखील नियम पाळले न गेल्याने याचा प्रसार वाढू लागला. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस देणं गरजेचं नाही.
महाराष्ट्रातील १८ वर्षापुढील लोक जे गंभीर आजाराने ग्रस्त आहे त्यांना लसीकरण करणे गरजेचं आहे. आज जर कोरोणा लस देण्यात आली तर रिकव्हरीसाठी लागणारा कालावधी हा खूप जास्त आहे जवळपास १ महिना कोरोनाच्या रिकव्हरीसाठी वेळ लागू शकतो. तसेच अत्यावश्यक लोकांना आधी लसीकरण करण्यात येत आहे. त्याच बरोबर सध्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता क्रेंद्र सरकारने राज्याला आवश्यक ते निर्णय घेण्याची परवानगी द्यावी असं डॉ. सुभाष साळुंखे यावेळी म्हणाले.

 

First Published on: April 1, 2021 8:26 PM
Exit mobile version