रेल्वेच्या यात्री ॲपद्वारे प्रवाशांना समजणार लोकलचे थेट लोकेशन

रेल्वेच्या यात्री ॲपद्वारे प्रवाशांना समजणार लोकलचे थेट लोकेशन

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळणार आहेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत यात्री ॲपच्या या वैशिष्ट्याचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, इती पांडे, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा), मध्य रेल्वे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. (central railway releases yatri app to track live location of local trains)

“यात्री ॲप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वे धावण्याविषयीची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. विशेषत: इतर कोणत्याही कारणांमुळे किंवा मेगाब्लॉक इत्यादींमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या काळात ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्या चालवल्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकते.”, असे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले.

लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग

‘यात्री’ हे एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे जे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आणि सुलभ प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत करेल. सर्व उपनगरीय रेकवर स्थापित जीपीएस उपकरणे आणि लोकल ट्रेनचे रिअल टाइम लोकेशन मिळवण्यासाठी विकसित केलेला अल्गोरिदम वापरकर्त्यांना नकाशावर थेट ट्रेनचे स्थान पाहण्यास आणि ट्रेनचे चिन्ह हलताना पाहण्यास सक्षम करेल.

डेटा दर १५ सेकंदांनी ऑटो रिफ्रेश होतो आणि ट्रेनचे अपडेट केलेले लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी वापरकर्ते रिफ्रेश बटणावर क्लिक करू शकतात. वापरकर्त्याला ट्रेनच्या आगमनाबाबत वेळेवर सूचना देखील मिळतील. ही सुविधा मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि बेलापूर/नेरुळ – खारकोपर लाईनवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

यात्री ॲपची इतर वैशिष्ट्ये


हेही वाचा – राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद

First Published on: July 14, 2022 10:20 AM
Exit mobile version