पुण्यात करोनाचा धसका, संचारबंदीचा प्रस्ताव; ३ दिवस तुळशीबाग बंद

पुण्यात करोनाचा धसका, संचारबंदीचा प्रस्ताव; ३ दिवस तुळशीबाग बंद

तीन दिवस तुळशीबाग बंद

पुण्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुण्यातील आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. पुण्यातील आठ महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यलयांच्या परिसराचाही समावेश आहे. या प्रस्तावावर पोलीस आयुक्त आज निर्णय घेणार आहे. दरम्यान, यापार्श्वभूमीवर तीन दिवस तुळशी बाग देखील बंद ठेवण्यात आली आहे.

तुळशीबाग तीन दिवस बंद

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध अशी तुळशीबाग तीन दिवस बंद राहणार आहे. पुण्यातील तुळशीबागेमध्ये विविध प्रकारच्या वस्तू मिळतात. त्यामुळे या बागेत महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला केलेल्या आवाहनाला असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे.

रुग्णांची संख्या ३३ वर

देश भरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ झाली असून त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे. तसेच ही संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी मुंबईत जमावबंदी आदेश लागू केला आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – कोल्हापुरात करोना संशयित महिलेचा मृत्यू


 

First Published on: March 16, 2020 8:29 AM
Exit mobile version