दोनच दिवसात राजकीय हादरे देणार – चंद्रकांत पाटील

दोनच दिवसात राजकीय हादरे देणार – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil slams the CM uddhav thackeray Devendra Fadnavis, Darekar visited from the ground

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत ‘पदवीधर’मध्ये महाविकास आघाडीने हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप करत लवकरच याचा खुलासा करणारी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. पदवीधर निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश मिळालं आहे त्याच पद्धतीचं यश आम्हाला पदवीधर निवडणुकीत मिळालं आहे. दोन दिवसातच माझी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्बस्फोट करणार आहे. निवडणुकीत कशाप्रकारे सत्तेचा गैरवापर करण्यात आला याचा खुलासा मी पत्रकार परिषदेत करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर निवडणुकीच्या पराभवावर पत्रकार परिषद घेणार असून पदवीधर निवडणुकीत कसा घोटाळा झाला याचा खुलासा करणार असल्याचं घोषित केलं आहे. “मराठावाडा पदवीधरमध्ये पाच हजार मतपत्रीका कोऱ्या निघाल्या. पुणे पदवीधरमध्ये अडिच हजार नावं ही पदवीधर नाही आते. त्यांच्या नावापुढे जो शिक्षणाचा रकाना आहे तिथे ७वी, ८ वी असं लिहिलं होतं. शिवाय, ११ हजार नावं अशी आली आहेत, ती पुन्हा पुन्हा आली आहेत. काही नावं तर सहावेळा आली आहेत. ज्यांची सहा नावं आली आहेत, त्या सहाही नावांनी मतदान झालं आहे. शेवटच्या साठ मिनिटांमध्ये १३७-१३८ असं मतदान झालं आहे. हे ९०० पौकी ३०० बुथवर झालं आहे. मी दोन दिवसांनी जी पत्रकार परिषद घेणार आहे त्यात डेमो दाखवणार आहे. मतदान प्रक्रियेत कितीवेळ लागतो हे दाखवणार आहे. एका मतदाराला तीन मिनिटं लागतात. मग ६० मिनिटांमध्ये १३७ मतदान कसं? एवढी मोठी हेराफेरी झाली आहे. तरीही लोकशाहीमध्ये जो निकाल लागला आहे तो मान्य केला आहे. पण हेराफेरी समोर आल्यानंतर तरी मान्य कराल की भाजपचा पराभव नाही आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नाही

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज लागले. चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये म्हणजेच खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. हा पराभव म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच भाजपासाठीही मोठा धक्का आहे. मात्र पाटील यांनी हा पराभव म्हणजे आपला पराभव असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. एक खानपूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी पहिली प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. अगदी थोड्या मतांनी आम्ही खानापूरमध्ये पराभूत झाल्याचं म्हटलं आहे. तसंच पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नसून महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे,” असंही म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत आघाडी केली. या आघाडीची चर्चा जोरदार सुरु होती. ही आघाडी शिवसेनेला पराभूत करेल असं वाटलं होतं. मात्र, शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत खानापूरमध्ये बाजी मारली आहे.


हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमध्ये भाजपला धक्का; शिवसेनेने मारली बाजी


 

First Published on: January 18, 2021 6:27 PM
Exit mobile version