…पण सावरकरांच्या निमित्ताने चूक सुधारली, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

…पण सावरकरांच्या निमित्ताने चूक सुधारली, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गट, भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात टीका केली आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, सावरकरांच्या निमित्ताने चूक सुधारली, असं म्हणत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आजानची स्पर्धा घेणं याकडे गाडी चालली होती ती ट्रॅकवर आली. लव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयावर त्यांच्याही मनात आग पेटली ही चांगली गोष्ट आहे. परंतु काँग्रसेच्या मनात कधीही पेटू शकत नाही. कारण ही त्यांची वोटबॅक आहे. पण सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर ती सुधारणं सर्वसामान्यांना आवडेल, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सहज सरकार आणू, त्या निवडणुकांमध्ये आम्ही इतके मजबूत असू. त्यामुळे आम्हाला शिंदे यांची शिवसेना पुरेशी आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच, स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला होता, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज उद्धव ठाकरे यांनी स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या जुन्या महापौर निवास येथे एका व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतिव प्रेम, आदर, निष्ठा आहेच. पण ज्यांचा स्वातंत्र्यसंग्रमाशी संबंध नाही, त्यांनी याविषयी बोलूच नये. आरएसएसला आता शंभर वर्षे पूर्ण होतील. पण या संघाचेही स्वातंत्र्यसंग्रमात काहीच योगदान नव्हते. ते स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी बोलूच नये. स्वातंत्र्य धोक्यात आल्यानंतर ते एकत्र आले आणि आता स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगावं आणि मगच आम्हाला बोलावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : भारत जोडो यात्रा : शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर.., युवा काँग्रेसचा


 

First Published on: November 17, 2022 9:23 PM
Exit mobile version