मनसेसोबत युतीसाठी माझ्या एकट्याची नव्हे तर केंद्राची परवानगी घ्यावी लागेल – चंद्रकांत पाटील

मनसेसोबत युतीसाठी माझ्या एकट्याची नव्हे तर केंद्राची परवानगी घ्यावी लागेल – चंद्रकांत पाटील

विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील, चंद्रकांत पाटलांचे विधान

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये होते. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील याच्यात नाशिकमध्ये १५ ते २० मिनिटांची भेट झाली या भेटींवरुन मनसे-भाजप युतीची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर मनसेसोबत युतीसाठी माझ्या एकट्याची नव्हे तर केंद्राची परवानगी घ्यावी लागेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मनसेचा परप्रांतीयांचा मुद्दा अडसर येत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. परंतू मनसे स्वबळावर लढणार असल्याचेही मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. राज ठाकरे माझे आवडते व्यक्तिमत्त्व आहे. राज ठाकरे बर बोलत नाही तर खर बोलतात. ते मला क्लिप पाठवणार होते ती त्यांनी पाठवली असून मी ऐकली देखील आहे. तसेच येत्या दोन दिवसांत राज ठाकरे आणि माझी भेट होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच या बैठकीमध्ये त्यांच्याकडे मनातील प्रश्न मांडणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

राज ठाकरेंची क्लीप मला मिळाली असून मी ती ऐकली आहे. परंतू मनसेसोबतच्या युतीचा निर्णय मी एकटा घेणार नाही. पक्ष नेतृत्व याबाबत निर्णय घेतील. कारण या युतीचे पडसाद देशाच्या राजकारणात पडणार आहेत. यामुळे मी एकटा निर्णय घेणार नाही तर आमची पार्टी निर्णय घेईल. आता कोणतीही युती लगेच होणार नाही यासाठी केंद्राचीही परवानगी घ्यावी लागणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांनी परप्रातींयाचा विरोधाचा मुद्दा सोडला तर युतीत अडचण निर्माण होणार नाही. जर ही अडचण दूर झआली तर लगेच युती होईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

First Published on: August 2, 2021 3:26 PM
Exit mobile version