चंद्रकांत पाटील पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, संजय राऊतांचा दावा

चंद्रकांत पाटील पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, संजय राऊतांचा दावा

कोल्हापूरः चंद्रकांत पाटील पूर्वी शिवसैनिक होते. त्यांचा विचारा ते परळमध्ये राहायचे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात एक सभा घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. भाजपच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका, काही दिवसांनी भाजपमधल्या काही लोकांना आयसीयूत भरती करावं लागेल, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

मराठी माणूस स्वाभिमानानं मुंबईत ताठ मानेनं जगतोय तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच हे विसरू नका. हजारो आणि लाको लोकं मुंबईत कागलची आहेत, त्याचं श्रेय शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना नाही. तेसुद्धा पूर्वी मुंबईत परळमध्ये राहायचे, शिवसैनिकच होते. विचारा त्यांना भारतीय जनता पक्षाच्या बडबडीकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण गेलेला आहे. काही दिवसांनी त्या सगळ्यांना आयसीयूत पाठवावं लागेल, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.

शिवसेनेचे नाही फुटले तर राष्ट्रवादीचे फुटणार, राष्ट्रवादीचे फुटत नाही तर काँग्रेसचे येत आहेत. हा फुटणार तो फुटणार तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी, यापुढे महाराष्ट्रात भाजपचे राज्य कधीच येणार नाही. हे तुम्हाला कागलच्या चौकात सांगतो आहे, असं म्हणत संजय राऊतांनी मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या फडणवीसांना टोला लगावलाय.

पुरोगामी विचारांचे राज्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली शिवसेना त्याचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करत आहेत. यापुढेसुद्धा ते या राज्याचे नेतृत्व करतील, असे वातवारण तयार झाले आहे. कोणीही कितीही आपटू द्या आपटून आपटून चपटी होईल, पण तुमचे राज्य येणार नाही. काहीही होणार नाही, असे संजय राऊत यांनी अधोरेखित केलेय. आपल्याकडे फक्त सच्चा कार्यकर्ता, शिवसेना राष्ट्रभक्तांची, प्रखर हिंदुत्ववाद्यांची संघटना आहे. आमच्या राष्ट्रभक्तीमध्ये भेसळ नाही तर आहे ते स्वच्छ असल्याचे राऊतांनी सांगितले.


हेही वाचाः आमचे आमदार फुटले नाही, तुमचं नशीब फुटलंय ते बघा, राऊतांचा भाजपवर घणाघात

First Published on: May 30, 2022 8:33 AM
Exit mobile version