आमचे आमदार फुटले नाही, तुमचं नशीब फुटलंय ते बघा, राऊतांचा भाजपवर घणाघात

राहुल भट उभा राहिल्यावर गोळीबार केला आणि दहशतवादी निघून गेले, अशा घटना घडत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत? हिंदूंचे कैवारी ना मग यावर बोला असे संजय राऊत म्हणाले आहेत.

sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. भाजपकडून (BJP) महाराष्ट्रात मोठं कारस्थान सुरु होते. परंतु छत्रपती शाहू महाराज यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आडवे झाले आहेत. आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचे आमदार फुटले नाही तुमचे नशीब फुटलंय ते बघा असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत सभेमध्ये संबोधित करत होते. शिवसनेचे नाही फुटले तर राष्ट्रवादीचे फुटणार, राष्ट्रवादीचे फुटत नाही तर काँग्रेसचे येत आहेत. हा फुटणार तो फुटणार तुमचं नशीब फुटलय ते बघा आदी, यापुढे महाराष्ट्रात भाजपचे राज्य कधीच येणार नाही. हे तुम्हाला कागलच्या चौकात सांगतो आहे. पुरोगामी विचारांचे राज्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली शिवसेना त्याचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करत आहेत. यापुढेसुद्धा ते या राज्याचे नेतृत्व करतील असे वातवारण तयार झाले आहे. कोणीही कितीही आपटू द्या आपटून आपटून चपटी होईल पण तुमचे राज्य येणार नाही. काहीही होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळी शाहू महाराजांना राजवाड्यात जाऊन भेटलो, आम्ही सगळे भेटलो आहे. शिवसेनेच्या बाबतीत जो काही वातवारण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. संभाजीराजेंना आम्ही फसवलं असं सांगत आहेत. काय फसवल? कोण आरोप करत आहे? भाजप ज्याने शिवसेनेला फसवलं, शिवसेनेला शब्द देणाऱ्या भाजपने फसवलं, बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीत दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही. मी आभार मानतो सर्व भाजपच्या नेत्यांचे तु्म्ही शब्द पाळला नाही. तो शब्द पाळला नाही म्हणून उत्तम सरकार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहे. काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात असे संजय राऊत म्हणाले.

शाहू महाराज छत्रपतींच्या वक्तव्यामुळे फडणवीस आडवे

शाहू महाराजांना भेटलो कालच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यानी सुंदर निवेदन महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे. शिवसेना कधीच फसवणाऱ्यांची संघटना राहिली नाही. शिवसेनेने कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. शिवसेनेला छत्रपती घराण्याचा फार आदर आहे. गैरसमज निर्माण करु नका असे स्वतः शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारखे सर्व नेते आडवे झाले आहेत. खूप मोठं कारस्थान शिवेसेनेविरुद्ध महाराष्ट्रात चालले होते. काय गुन्हा तर जिल्हा प्रमुख संजय पवार सामान्य शिवसैनिक त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतला. हे शिवसेनेत होऊ शकते. बाकी सगळे शेठ, धनदांडगे मंडळी भाजपमध्ये व्यापार आहे. आपल्याकडे फक्त सच्चा कार्यकर्ता, शिवसेना राष्ट्रभक्तांची, प्रखर हिंदुत्ववाद्यांची संघटना आहे. आमच्या राष्ट्रभक्तीमध्ये भेसळ नाही तर आहे ते स्वच्छ असल्याचे राऊतांनी सांगितले.

हिंदूंचै कैवारी PM मोदी कुठे आहेत? 

काश्मिरमध्ये पुन्हा अतिरेक्यांचा हल्ला झाला आहे. गेल्या ३ महिन्यामध्ये अतिरेक्यांचे ५५ हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी मारले गेले आहेत तर १७ काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. हिंदुत्ववादी सरकार काय करत आहे. राहुल भट नावाचा सरकारी कर्मचारी काश्मिरी पंडित त्याच्या कार्यालयता दहशवादी घुसले, कोण आहे राहुल भट विचारु लागले, राहुल भट उभा राहिल्यावर गोळीबार केला आणि दहशतवादी निघून गेले, अशा घटना घडत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत? हिंदूंचे कैवारी ना मग यावर बोला असे संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : Navneet Rana : राणा दाम्पत्याला स्वागत रॅली भोवली, राणांसह शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल