हे तर मानसिक दिवाळखोरीचे लक्षण, चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल

हे तर मानसिक दिवाळखोरीचे लक्षण, चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल

इंडिया आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर राजकीय पातळीवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आज नागपुरात बोलत होते. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत विक्षिप्तपणाने वक्तव्य केलेलं आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे मोदी आणि शाह यांच्याबाबत जे बोलले ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आमच्या नेतृत्त्वावर टीका केली तर राज्यभरात निषेध व्यक्त करावा लागेल. तसेच अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा उद्रेक होईल, असंही बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर पुण्यातील खडकवासला येथे एका जाहीर सभेत बोलत होते. देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.


हेही वाचा : मोठी बातमी! भ्रष्टाचार प्रकरणात BMC चे ५५ कर्मचारी बडतर्फ, ५३


 

First Published on: January 31, 2023 5:26 PM
Exit mobile version