विनापरवाना वाळू उपसा रोखण्यासाठी १५ ठिकाणी चेक पोस्ट

विनापरवाना वाळू उपसा रोखण्यासाठी १५ ठिकाणी चेक पोस्ट

जळगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी आता शहर तसेच जिल्ह्यात १५ ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात येणार आहेत. चेक पोस्ट कोणत्या मार्गावर असावेत याबबात पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आठवडाभरात ठिकाणांची यादी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच संबंधित चेक पोस्टवर महसूल, पोलिसी आणि उपप्रादेशिक परिवहनचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले.

वाचा : बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ७३ जणांवर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जिल्ह्यातील विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात वाळूचोरी तसेच त्यावर होणाऱ्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. वाळू लिलाव न झाल्याने नदीपात्रातून वाळू उपसा होणार नाही, त्याची वाहतूक होणार नाही, यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

वाचा : वाळू तस्करांकडून स्मशानभूमीतच वाळू उपसा

पोलिसांकडून संरक्षणही 

तसेच जलसंपदा विभागाकडून परस्पर मुरूम उपसा करण्यास परवानगी देण्यात येते. पण त्याची रॉयल्टी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमा करणे बंधनकारक आहे. जलसंपदा विभागाने जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता मध्यम प्रकल्प आदी ठिकाणावरून मुरूम उपशाला परवानगी देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. अर्धनारी-बठाण येथे वाळू उपशाला विरोध असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार वाळू वाहतूक करण्यासाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशा सूचना करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

वाचा : विरारमध्ये वाळू माफियांवर कारवाई

वाचा : रेतीमाफियाचा उच्छाद; तहसीलदारावर चढवला ट्रक

First Published on: November 21, 2018 4:23 PM
Exit mobile version