मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला डान्सबारचा मुद्दा आणि आव्हाड झाले संतप्त

मुख्यमंत्र्यांनी उपस्थित  केला डान्सबारचा मुद्दा आणि आव्हाड झाले संतप्त

मुंबई – राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सभागृहात करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी डान्सबार सुरु असल्याची एक जुनी क्लिप व्हायरल होत असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले. त्यांना हे सर्व माहित आहे असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यावर आव्हाड यांनी लगेच आक्षेप घेतला. पण याबाबत आपण काही वाईट बोलत नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नेमके काय घडले –

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काय स्थिती आहे हे सांगीतले. यावेळी जिथे गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत तिथे योग्य त्या सूचनाही दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. हे सांगत असताना डान्सबार तर बंद आहेतच पण मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांच्या नावाचा उल्लेख त्यांना सर्व माहित असल्याचे सांगीतले. यावेळी सभागृहात हशा पिकला.

जितेंद्र अव्हाडांचा आक्षेप –

डान्सबारचा विषय निघताच मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले. त्यामुळे आव्हाड चांगलेच संतापले , पण यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्हाला केवळ माहिती आहे असे म्हटले मी…तर जाता कुठे असे सांगितले, यावर आव्हाड हे संतपालेलेच होते पण चांगलेही सांगायचे अवघड झाल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यानी दुसऱ्या विषयाला हात घातला.

चांगल बोलणेही वाईटच –

राज्यातील डान्सबार बंद आहेत अशी माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा हवाला देत त्यांना हे माहिती असल्याचे सांगितले, पण आव्हाड चांगलेच संतापले होते. चांगल बोलणेही वाईटच आहे, मग वाईट बोलू..दुसरे सांगू येथे सर्वांना असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First Published on: August 25, 2022 6:20 PM
Exit mobile version