फोन करण्यासाठी चक्क विमानच थांबवलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किस्सा व्हायरल

फोन करण्यासाठी चक्क विमानच थांबवलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किस्सा व्हायरल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) हे नेहमीच चर्चेच्या क्रेंद्रस्थानी असतात. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासूनच शिंदेंनी कामाचा धडाका लावला आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या औचित्याने ते राज्यातील विविध जिल्यांना भेट देत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या(nashik) मालगावात सुद्धा सभा झाली. या सभेत बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी एक वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा – एकनाथ शिंदेंकडून विकासकामांचा धडाका, धार्मिकस्थळांसाठी विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यांनतर एकनाथ शिंदेंनी(cm eknath shinde) राज्याच्या विविध भागात विकास कामांचा धडाकाच लावला आहे. नाशिकच्या मालेगाव इथल्या भाषणात मुख्यमंत्री त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलत होते. ‘आपण मुख्यमंत्री झालो तरी माझ्यातील कार्यकर्ता कधीच मारणार नाही. आपण डायरेक्ट फोन उचलून काम करण्याचे आदेश देतो’. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा – संजय राऊतांच्या घरातील रोकडवर मुख्यमंत्र्यांचं नाव, शिंदे म्हणाले मी त्यांच्या घरी…

नेमका किस्सा काय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांच्या ओळखीतील एका व्यक्तीवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान त्या वत्यक्तिच्या काही वैद्यकीय चाचण्यांनाचे रिपोर्ट्स मिळण्यासाठी काही कारणाने उशीर होत होता. त्याच संदर्भांत एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘अरे माणूस गेल्यावर फोन करून काय उपयोग? माणसाला वेळेत उपचार मिळण्यासाठी फोन केला पाहिजे ना. त्यावेळी मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात असलेल्या अधिकाऱ्याला मी फोने लावत होतो पण फोन लागत नव्हता. त्यावेळी मी वैमानिकाला सांगितले की ५ मिनिटं विमान थांबाव मला एक महत्वाचा फोन लावायचा आहे’. आणि त्या नंतर मी लावला. विमानाचा पायलट थांबून होता. मी फोन लावला आणि लगेच त्या व्यक्तीला रिपोर्ट मिळाला.

एकूणच हा किस्सा असा आहे. की ज्याची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या मालेगाव येथे झालेल्या सभेत हा किस्सा संगीतला.

हे ही वाचा – जे आदेश देतात तेच नियम पाळत नाहीत, मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची टीका

First Published on: August 2, 2022 3:43 PM
Exit mobile version