घरमहाराष्ट्रजे आदेश देतात तेच नियम पाळत नाहीत, मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची टीका

जे आदेश देतात तेच नियम पाळत नाहीत, मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची टीका

Subscribe

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली. यावेळी पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे. मात्र, राज्याचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री गावोगावी सत्कार घेत फरत आहेत. मुख्यमंत्र्यांची भाषणे रात्री 10 नंतर सुरू असतात. जे आदेश देतात तेच नियम पाळत नाहीत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत –

- Advertisement -

राज्यात अनेक शेतकऱ्यांचे संसार पूरामुळे उघड्यावर आले आहेत. अनेकांचे नुकसान झाले आहे तरीही तिथे अजून पंचनामे झालेले नाहीत. तातडीने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी फळबागांच नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांची मदत जाहीर केली पाहिजे असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची भाषणे रात्री 10 नंतर –

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची भाषणे रात्री 10 नंतर सुरू असतात. जे आदेश देतात तेच नियम पाळत नाहीत अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचबरोबर अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे. शेतमजूरांना मजूरी नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्याचा पुरवठा केला पाहिजे, तसेच त्यांना आर्थिक मदतही केली पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी यावेळी केली आहे.

स्थगिती दिलेली कामे पुन्हा सुरू करा –

राज्यातील विविध विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे अनेकांत चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थगिती दिलेले काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावीत. श्रावणात लोकं शाकाहारावर जास्त भर देतात त्यामुळे भाजीपाल्याचे कमतरता राज्यात भासू शकते. त्यावर सरकारने काय पावले उचलले आहेत यावर कोणीच बोलायला तयार नाही असा आरोप पवारांनी केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -