मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला नाशिक विभागाच्या पाच जिल्ह्यांचा आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला नाशिक विभागाच्या पाच जिल्ह्यांचा आढावा

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मालेगावात नाशिक विभागीय आढावा बैठक घेतली. नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजप सेना युती सरकार आल्यानंतर लोकहिताचे निर्णय घेण्याचा धडाका आम्ही सुरू केलाय. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विभागांमध्ये जाउन बैठका घेत आहोत. विभागात बैठक घेतल्याने जागेवर निर्णय घेता येतात. आज नाशिकमध्ये पाच जिल्हयांची बैठक घेतली. अतिवृष्टी, आरोग्य, वीज, नारपार योजनांबाबत चर्चा झाली आरोग्य क्षेत्र सक्षम करणे गरजेचे कृषी विद्यापीठ सक्षम करणे गरजेचे रस्ते खडडेमुक्त करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. शेती क्षेत्रात सेंद्रिय शेती, आधुनिकरीकरणाला बळ देणे आवश्यक अशा बैठकांमधून रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील या प्रकल्पांचा जनतेला फायदा करून देण्याचा आमचा हेतू असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.

मालेगाव जिल्हा

यावेळी बहुचर्चित मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत मागणी आली आहे. काही लोकप्रतिनिधींनी सुचनाही केल्या आहेत. कोणत्याही जिल्हयाची निर्मिती ही विकासाच्यादृष्टीने केली जाते. आपल्याला लोकहिताचं काम करायचं आहे. मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत लवकरच मुंबईत बैठक घेउन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

First Published on: July 30, 2022 2:50 PM
Exit mobile version