Chitra Wagh : महिलांच्या आत्मसन्मानावर काँग्रेसनेच सपासप वार केलेत, चित्रा वाघांची टीका

Chitra Wagh : महिलांच्या आत्मसन्मानावर काँग्रेसनेच सपासप वार केलेत, चित्रा वाघांची टीका

मुंबई : काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुप्रिया श्रीनेट आणि एचएस अहिर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्वीट करत काँग्रेसच्या महिलाविषयक भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा – Politics: सुधीर मुनगंटीवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

निवडणुकीच्या धुळवडीत काँग्रेसवाल्यांचे महिलाद्वेषाने माखलेले हिडीस चेहरे एक-एक करून समोर येत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नारीशक्तीला संपविण्याच्या वक्तव्यावरून यांना आपला हिंदू धर्म आणि महिलांना आदिशक्ती मानून केले जाणारे त्यांचे पूजन याचा किती तिटकारा आहे, हे समोर आले होते, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

या चिखलफेकीत आता काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारीही उतरल्या आहेत. काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सुप्रिया श्रीनेत यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या उमेदवारीवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. कंगनाच्या फोटोसह एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली, नंतर ती डिलीट केली असली तरी यावरून हा पक्ष स्त्रीचा किती सन्मान करतो, याची लक्तरे वेशीवर मांडणारीच ती पोस्ट होती, अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Congress on PM Modi : …आणि मोदींनी काँग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त केलं; काय म्हणाले जयराम रमेश

अभिनयासारख्या कलेबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या काँग्रेसनेच देशातल्या महिलांच्या आत्मसन्मानावर आजपर्यंत सपासप वार केले आहेत. काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या अशा लहान-मोठ्या नेत्यांमध्ये महिलाद्वेषाचे विष पुरेपूर भरलेले आहे. ते विष या देशातल्या महिलाच आता उतरवतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्या लाजिरवाण्या वर्तनामुळे राष्ट्रीय महिला आयोगाला धक्का बसला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर कंगना रणौतबद्दल असभ्य आणि अपमानजनक कमेंट केली होती. असे वागणे महिलांच्या प्रतिष्ठे विरुद्ध आहे. रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणुकीच्या रिंगणात भाजपाची ‘स्टार पॉवर’, सेलिब्रिटिंना तिकिटे

First Published on: March 26, 2024 1:29 PM
Exit mobile version