घरदेश-विदेशCongress on PM Modi : ...आणि मोदींनी काँग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त केलं; काय म्हणाले...

Congress on PM Modi : …आणि मोदींनी काँग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त केलं; काय म्हणाले जयराम रमेश

Subscribe

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या भाजप प्रवेशावरून जिंदल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. आजपर्यंत काँग्रेसमुक्त भारत करणार अशा घोषणा भाजपा सतत देत होता. पण, या घोषणा देता देता मोदींनी कॉंग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त बनवलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कॉंग्रेसचे माजी खासदार आणि उद्योगपती असणाऱ्या नवीन जिंदाल यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच हरियाणातील कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून याबाबत भाष्य केले.

- Advertisement -

मोठ्या आकाराच्या वॉशिंग मशीनची गरज भासल्यावर हे घडणारच होते. गेल्या दहा वर्षांत कॉंग्रेससाठी शून्य योगदान दिल्यावर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगणे हा मोठाच विनोद आहे, अशा शब्दात रमेश यांनी जिंदाल यांच्यावर टीका केली आहे. कॉंग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यास भाग पाडण्यासाठी ईडी, सीबीआयबरोबरच अनेक वॉशिंग मशीन तैनात केल्या आहेत, अशी उपरोधिक टिप्पणीही रमेश यांनी केली. काही प्रकरणांमध्ये जिंदाल ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होते. त्याचा संदर्भ घेत रमेश यांनी ही टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणुकीच्या रिंगणात भाजपाची ‘स्टार पॉवर’, सेलिब्रिटिंना तिकिटे

पंतप्रधानांना काँग्रेसमुक्त भारत हवा होता. त्याऐवजी त्यांनी भ्रष्ट काँग्रेसजनांनाच आपल्या पक्षात घेतले.  विरोधी पक्षांनी अनेकदा भारतीय जनता पक्षावर (भाजप) आरोप असलेल्या नेत्यांना त्यांच्या पक्षात  सामावून घेतल्याचा आरोप केला आहे. आणि एकदा ते भाजपामध्ये गेले की, त्यानंतर त्यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल कधीही बोलले जात नाही, असेही रमेश म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर करणाऱ्या भाजपने हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून जिंदाल यांना उमेदवारी दिली आहे. जिंदाल यांनी रविवारी संध्याकाळी ‘एक्स’वर काँग्रेस पक्षाचा राजीनामा जाहीर केला. त्यांनी पक्ष आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आभार मानले.

हेही वाचा – Kangana Ranaut : कंगना रणौतबाबत अपमानास्पद टिप्पणी; महिला आयोगाने घेतली दखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -