घरमहाराष्ट्रPolitics: सुधीर मुनगंटीवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Politics: सुधीर मुनगंटीवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Subscribe

चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभेचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि दिग्गज नेते मंडळी यांनी उपस्थिती लावली आहे. (Politics Sudhir Mungantiwar to win with historic margin Chandrashekhar Bawankule expressed his belief)

उमेदवारी अर्जाआधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भित्तीशिल्पापासून रॅलीला सुरुवात होऊन ही रॅली गांधी चौकात छोटेखानी सभेचे आयोजन करुन संपवली जाणार आहे. चंद्रपुरात मुनगंटीवारांच्या विरोधात धानोरकर उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अर्ज भरण्यापूर्वी भाजपाने महायुतीची सभा आयोजित केली. या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केलं, यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

(हेही वाचा :Nana Patole: भिवंडी-सांगली आमच्या परंपरागत जागा; कोणीही दावा करू नये, पटोलेंचं सूचक विधान)

- Advertisement -

विकसित भारताची मोदींची गॅरंटी

पंतप्रधान मोदींनी विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करण्याच्यादृष्टीने हे पाऊल आहे. 2047 च्या विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी मोदींनी 2024 ला केली आहे. चंद्रपुरातून या विकसित भारताची एक विट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने ठेवून त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून देऊ, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -