अनुसूचित जातीमध्ये ख्रिस्ती समाजाला समाविष्ट करा

अनुसूचित जातीमध्ये ख्रिस्ती समाजाला समाविष्ट करा

फोटो प्रातिनिधीक आहे.

मागासवर्गीय ख्रिस्ती समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा, अशी मागणी ख्रिस्ती समाजाकडून करण्यात आली आहे. ख्रिस्तीसमाजाचे समाजसेवक अॅड. जॉन कुसमुडे आणि अॅड जॉन खरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भातील एक निवेदन देखील त्यांना केले आहे.

वाचा- मराठा आरक्षण कायदा राज्यभरामध्ये लागू

काय आहे निवदेनात ?

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मागासवर्गीय आयोग आणि दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यास गटाने ख्रिस्ती धर्मातरीतांना अनुसूचित जातीचे संरक्षण देण्याबाबतची शिफारस सरकारला केली आहे. त्यानुसार ख्रिस्ती समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया झाली असली तरी ख्रिस्ती समाजाला अद्यापही आरक्षण मिळालेले नाही. या आधी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हिंदू मागासवर्गीय, शीख मागासवर्गीय आणि बौद्ध मागासवर्गीय धर्मातरितांना मिळाला आहे आणि त्यांना अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षणात आरक्षणाचा लाभ कोणालाच मिळालेला नाही. ख्रिस्ती समाज या मागणीसाठी आंदोलन करणार नाही. पण मागणी पूर्ण होईपर्यंत निवेदनाच्या स्वरुपात सनदशीर मार्गाने मागणी करत राहिल, असे या निवेदनात नमूद रण्यात आले आहे.

हे माहित आहे का?- मुस्लिम आरक्षणासाठी MIM सर्वोच्च न्यायालयात जाणार

 

 

First Published on: December 4, 2018 7:58 PM
Exit mobile version