आयसीएसई बोर्डानेही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

आयसीएसई बोर्डानेही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयबी बोर्डापाठोपाठ आता आयसीएसई बोर्डानेही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आयसीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार होती. मात्र, देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. परीक्षा घेण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा घेण्यासंदर्भात घेतलेल्या आढाव्यामध्ये विद्यार्थ्यांना आयसीएसई बोर्डाकडून दोन पर्याय देण्यात आले होते. बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत ऑफलाईन परीक्षा देणे आणि ऑफलाईन परीक्षा न देणे असे पर्याय दिले होते. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा न देण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे आयसीएसई बोर्डाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आणि भेदभाव न करणार्‍या पद्धतीने निकाल लावण्यात येईल, असे सांगण्यात आले.

First Published on: April 17, 2021 4:30 AM
Exit mobile version