कोरोना : महापालिकेमार्फत नागरिकांना मिळणार होमिओपॅथी औषध

कोरोना : महापालिकेमार्फत नागरिकांना मिळणार होमिओपॅथी औषध

नाशिक शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीतील झोपडपट्टी व गावठाण भागातील नागरिकांना कोव्हिड-१९ चे होमिओपॅथी औषध सामाजिक संस्थांव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत वैदयकीय विभागास महापौर सतिश कुलकर्णी यांनी आदेशित केले आहे.

महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनामुक्तीसाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहे. शहरात रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे १५२ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. अशा परिस्थितीस आयुष मंत्रालयव्दारे प्रमाणित कोरोना व्हायरस संक्रमणविरोधी औषध अर्सेनिक अल्बम-३० व्यक्तीच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरत असून व्यक्ती लवकर संक्रमित होत नाही. यासाठी होमिओपॅथी औषध बाजारात उपलब्ध आहे. या अंतर्गत नाशिक महापालिका नागरिकांसाठी सामाजिक संस्थाव्दारे अर्सेनिक अल्बम-३० औषध उपलब्ध करुन देण्याबाबत वैदयकीय विभागास महापौर सतिश कुलकर्णी यांनी आदेशित केले आहे. त्याबाबत तत्काळ अंमलबजावणी होण्याबाबत सूचित केले आहे.

First Published on: May 28, 2020 8:47 PM
Exit mobile version