‘विठ्ठलरुपी जनतेच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीही मान मिळेल’

‘विठ्ठलरुपी जनतेच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीही मान मिळेल’

मुख्यमंत्र्यांनी सहपत्नी श्री विठ्ठल – रुख्मिणीचे घेतले दर्शन

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नी श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेत शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण या दाम्पत्यांना यंदाचा पूजेचा मान मिळाला आहे. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीने हा पूजा विधी आज पहाटे करण्यात आला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

महापूजेनंतर मंदिर समिती आणि मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणले की, ‘राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे! बळीराजा तुझा आशीर्वाद मिळू दे आणि माझा महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम् आणि संपन्न होऊ दे. महाराष्ट्रात पावसाची गरज आहे त्यामुळे चांगला पाऊस पडू दे‘, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल – रुख्मिणीला घातले आहेविठ्ठलरूपी जनतेच्या आशीर्वादाने पुढील वर्षी देखील पुजेचा मान मिळेल, असा आशावादही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखविला.

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना मागील आषाढी एकादशीला पंढरपूरला येता आले नाही. याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली. ते म्हणाले गेल्या वर्षी आषाढी एकादशीला मला पंढरपूराला येऊन श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मी वर्षाबंगल्यावरच पूजा केली आणि यंदा देखील मी त्यांच्या आशीर्वादानेच पंढरपूरात येऊन श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेतले आहे.


हेही वाचा – दिव्यांग मुलांवर ‘वारी’चे पहिलेच गीत


First Published on: July 12, 2019 7:53 AM
Exit mobile version