‘पाकिस्तानचं कौतुक केल्याने ते मतदान करतील या भ्रमात पवारांनी राहू नये’

‘पाकिस्तानचं कौतुक केल्याने ते मतदान करतील या भ्रमात पवारांनी राहू नये’

काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तान संदर्भात वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे. यावेळी शरद पवारांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. त्यांच्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला याचा विचार करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये.’


हेही वाचा – …तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – उद्धव ठाकरे

तसेच उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समर्थन देखील केलं आहे. शरद पावार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी कोणतेही भाष्य करताना नेहमी विचार करायला हवा. पाकिस्तानचे कौतुक केले तर ते खूष होऊन मतदान करतील या भ्रमात राहू नये, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. दरम्य़ान, निवडणुका येतील आणि जातील. मात्र, शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यातून राष्ट्रवादी पक्षाची मानसिकता समोर कळते. त्यामुळे मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारचे वक्तव्य करू नये, मुख्यमंत्र्यांनी पवारांवर थेट हल्लाबोल केला.

कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजीत देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

First Published on: September 16, 2019 11:40 AM
Exit mobile version