शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

शिवसेना पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. परंतु शिवसेना पक्ष अधिकृतरित्या मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित ही कार्यकारिणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवला आहे. ही कार्यकारिणीची बैठक उद्या संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील ताज प्रेसेंडेंट येथे आयोजित करणायत आली आहे. यामध्ये पक्षाची पुढील वाटचाल, पुढील ध्येय धोरणे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय कार्यकारणीत पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी आहे. जिल्हाप्रमुखांच्या त्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलं आहे. दोन चार दिवसात काय निर्णय येतो हे महत्त्वाचं राहील. कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर काय होईल?, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : अंबानी आणि अदानींपेक्षा माझा वेळ अधिक मौल्यवान, बाबा रामदेवांचं मोठं


 

First Published on: February 20, 2023 7:06 PM
Exit mobile version