मुख्यमंत्री शिंदे आमदार, खासदारांसह गुवाहाटीत तर अब्दुल सत्तार नाशकात, काय आहे नेमके कारण?

मुख्यमंत्री शिंदे आमदार, खासदारांसह गुवाहाटीत तर अब्दुल सत्तार नाशकात, काय आहे नेमके कारण?

एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास - अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीला गेले असून तेथे ते कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासोबत न जाता कृषिमंत्री अब्दुल सत्तार थेट नाशकात आल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यानंतर पहील्यांदाच सत्तार नाशिकमध्ये आले आहेत.

यावर सत्तार यांना विचारले असता त्यांनी नाशिकमधील कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देण्यास आल्याचे सांगत उत्तर देणे टाळले. सत्तार शुक्रवारी संध्याकाळीच नाशिकमध्ये आले असून येथील कृषीथॉन प्रदर्शनात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते सिल्लोड मतदारसंघातही जाणार आहेत.

विशेष म्हणजे शिंदे गटात नेहमी आघाडीवर असलेल्या सत्तारांसह गुलाबराव पाटील आणि अन्य चारजणांनीही मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ वळवली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदार, खासदार नाराज असल्याची चर्चा आहे.

 

First Published on: November 26, 2022 1:30 PM
Exit mobile version