Breaking: पोहरादेवीतील गर्दीवर तात्काळ कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Breaking: पोहरादेवीतील गर्दीवर तात्काळ कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Breaking: पोहरादेवीतील गर्दीवर तात्काळ कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वनमंत्री संजय राठोड तब्बल १५ दिवसांनी माध्यमांसमोबर आले. यावेळी संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि हा राजकीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला. यादरम्यान पोहरादेवी गडावर हजारो कार्यकर्ते संजय राठोड यांच्या समर्थनार्थ दाखल झाले होते. पण यावेळी समर्थकांनी कोरोनाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले. त्यामुळे आता यांची गंभीर दखल घेत, पोहरादेवीतील गर्दीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

आज पोहरादेवीत संजय राठोड यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण यादरम्यान संजय राठोड यांच्या समर्थकांनी सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडवला, तोंडावरील मास्क दिसेनासे झाले. यावेळी पोलिसांमध्ये धक्काबुकीसुद्धा झाली. पण याचीच गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. कोरोना संदर्भातील नियम हे सर्वांना सारखेच असतात असे म्हणत, पोहरादेवी येथे गर्दी करणाऱ्यांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनांची गंभीर दखल घेऊन तात्काळ प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले.


हेही वाचा – संजय राठोड यांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं जातंय, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया


 

First Published on: February 23, 2021 6:54 PM
Exit mobile version