Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संजय राठोड यांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं जातंय, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं जातंय, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयीत आरोपी असलेल्या वनमंत्री संजय राठोड तब्बल १५ दिवसांनी सगळ्यांसमोर आले. आज पत्नीसह त्यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं आणि माध्यमांसमोर आपली बाजू स्पष्ट केली. यावेळी संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावर भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पण याच पार्श्वभूमी आता शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘संजय राठोडांनी वादाच्या भोवऱ्यात ओढळं जातंय,’ असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

मनिषा कायंदे म्हणाल्या की, ‘संजय राठोड यांनी या कार्यक्रमासाठी कोणाला निमंत्रण दिलं असेल, असं मला वाटत नाही. हा विषय खूप संवेदनशील असून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर परिणाम करणार आहे. आज ते पहिल्यांदा याप्रकरणी माध्यमांशी बोलले. हा कौटुंबिक कार्यक्रम होता. आता त्यामध्ये त्यांच्या समाजाची लोकं गेली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खास करून मंत्र्यांनी ही जबाबदारी आहे. तसेच या कार्यक्रमाला माध्यमसुद्धा मोठ्या प्रमाणात गेलं होत. त्यामुळे या कौटुंबिक कार्यक्रमाला एक वेगळं स्वरुप आलं. प्रत्येकाने आपली जबाबदारी घेतली पाहिजे, असं कोणतेही कार्यक्रम होता कामा नये. परंतु हा वेगळा विषय त्यांच्या जीवनातला असल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासोबत दर्शनाला गेले.’

- Advertisement -

पुढे त्या म्हणाल्या की, ‘तिला या वादाच्या भोवऱ्यात आणायचं. माझ्या मते, हा विषय खूप गंभीर आणि संवेदनशील आहे. महाराष्ट्रात कायद्याचं सरकार आहे. त्यामुळे पूर्णपणे चौकशी होईल, हे पहिल्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.’


हेही वाचा – संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची मुक संमती – आशिष शेलार


- Advertisement -

 

- Advertisement -