नोटबंदी, लॉकडाऊनसारखे ‘भोंगाबंदी’ देशभरात करा ना, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा

नोटबंदी, लॉकडाऊनसारखे ‘भोंगाबंदी’ देशभरात करा ना, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा

भोंग्यांच्या विषयावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला एक धोरण करण्यास सांगितले आहे. भोंगे हटवण्यात यावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसेच यूपीमध्ये भोंगे हटवण्यात आले आहेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. देशात नोटबंदी, लॉकडाऊन जसे केंद्र सरकारने देशभरात केलं तसेच भोंगाबंदी देशभरात करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. भोंग्यांचा विषय मला गौण वाटतो इतर महत्त्वाचे विषय असून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा महत्त्वाचा विषय माझ्यासमोर आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनसेवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी त्यांना भोंग्यांवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, भोंग्यांचा विषय गाजलेला मुद्दा वाटत नाही. भोंग्यांचा विषयी सर्वोच्च न्यायालायने निर्णय दिला आहे. तो निर्णय देशासाठी आहे. या विषयावर मागील आठवड्यात राज्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये ठरलं जसं केंद्राने नोटाबंदी देशात केलं, लॉकडाऊन देशात केलं तसेच भोंगाबंदी देशात करा, सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांसदर्भात निर्णय दिला आहे. त्यामध्ये केंद्र सरकार ही एक पार्टी आहे. केंद्राने एख आदेश काढून देशभरात लागू केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाहिला तर सर्वधर्मीय आणि तो सर्वांना लागू आहे. त्यामुळे नुसते भोंगे काढा असे नाही तर सर्वच धर्मातील लोकांना तो नियम पाळावा लागेल.

यूपीत भोंग्यांपेक्षा कोरोना काळातील प्रेतं महत्त्वाचा मुद्दा

परंतु मला आता भोंग्यांचा मुद्दा गौण वाटत आहे. कारण माझ्यापुढे राज्याला पुढे नेण्याचा प्रश्न आहे. गुंतवणूक वाढवायची आहे. जे कोरोनमुळे अर्थचक्र थांबले आहे ते परत फिरवायचं आहे. खुप मोठे आव्हान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगींनी उत्तर प्रदेशात अनेक भोंगे काढण्यात आले. ते करु शकतात तर महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना करण्यात आला यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, यूपीमध्ये कोरोना काळात गंगेत प्रेतं फेकण्यात आले. त्याचे विधी झाले नाही. ७० पेक्षा अधिक मुलं ऑक्सिजनअभावी दगावले, कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्यानंतर अनेक भयानक फोटो देखील समोर येत होते. मोठीच्या मोठी मैदान स्मशानभूमीसारखे झाले होते. तो खरा मुद्दा होता. तो आकडा खरा असेल असे मला वाटत नाही. ते करु शकले नसले म्हणून असे करुन लोकप्रिय होत असतील तर त्यांची लोकप्रियता त्यांना लाभो मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला आहे.

अजानच्या पाठीमागे अजानतेपणा

तुमच्याकडे ती बातमी आली होती. त्यांनी भोंगे काढले आहेत परंतु त्यांच्याकडे परवानगी मागितल्यावर ते भोंगे पुन्हा चढणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वांनाच परवानगी लागणार आणि सर्वांना डेसीबल पाळावे लागणार आहे. मग ते आजान, किर्तन , भजन याला सर्वांना पाळावे लागणार आहे. जेव्हा याची अंमलबजावणी केली तर अजानच्या पाठीमागे अजानतेपणाने जे काही चालले आहे ते पहिलं पाहावे असा सल्लासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.


हेही वाचा : मराठीनंतर हिंदुत्वाचा खेळ सुरु करुन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

First Published on: May 1, 2022 1:33 PM
Exit mobile version