ओबीसी आरक्षणासाठी आयोग २२ मे रोजी नाशकात

ओबीसी आरक्षणासाठी आयोग २२ मे रोजी नाशकात

सर्वोच्च न्यायालयाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थंच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची सुचना निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग कामाला लागला आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील ओबीसी समाजाची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार येत्या २१ मे पासून समर्पित आयोगाचा दौरा करणार आहे. नाशिकमध्ये २२ मे रोजी आयोग दाखल होणार असून राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात येऊन मते मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षणासाठी गठितआयोग 22 मे रोजी नाशिक विभागीय दौर्‍यावर असून, या दौर्‍यात नागरिकांची व या क्षेत्रात काम करणार्‍या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आगोदर नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासंदर्भात आयोगामार्फत जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजे ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. या आयोगाने राज्यातील या क्षेत्रात काम करणार्‍या विविध सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून 21 मे ते 28 मे या कालावधीत राज्यातील विविध विभागात भेटीचा कार्यक्रम घोषित केला आहे. घोषित दौर्‍यानुसार आयोग रविवार, 22 मे रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत भेट देणार आहे.

अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी
या क्षेत्रात काम करणार्‍या नाशिक विभागांतर्गत असलेल्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदूरबार या जिल्ह्यातील ज्या सामाजिक संघटना व नागरिकांना आपली मते व निवेदने आयोगासमोर सादर करावयाची आहेत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: May 13, 2022 10:28 PM
Exit mobile version