काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या मेहुण्याला ईडीची नोटीस; वाचा नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या मेहुण्याला ईडीची नोटीस; वाचा नेमकं प्रकरण काय?

मागील अनेक महिन्यांपासून राजकीय नेत्यांना ईडीकडून नोटीसा बजावल्या जात आहेत. यामध्ये विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीसांचा सामना करावा लागत आहे. असे असताना नुकताच महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे मेव्हणे प्रवीण काकडे यांना ईडीने नोटीस पाठवण्यात आली आहे. (congress mp balu dhanorkar brother in law pravin kakde get ed notice)

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ बँक नोकर भरती प्रकरणात एका तक्रारीवरून ईडीने ही नोटीस पाठविल्याच पत्रात नमूद आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र मिळायच्या आधीच समाज माध्यमात पत्र वायरल झाले आहे. या पत्राबाबत उलट सुलट चर्चा समाज माध्यमात सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयांना एक पत्र पाठविण्यात आले आहे.

खासदार बाळू धानोरकर यांचे मेव्हणे प्रवीण काकडे यांच्यावर भद्रावतीसह जिल्ह्यातील कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मागितली आहे. यासंदर्भात अधिकृत पत्र आपल्याला मिळालेले नाही, असे जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही नोटीस पाठविली आहे. सदर पत्रात पीएमएलए अधिनियम अंतर्गत चौकशी करण्यात येणार असा उल्लेख आहे. 8 मेला ईडीने नोटीस पाठविली आहे. जिल्हातील भद्रावती व आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात काकडे यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल असल्याचे म्हटले आहे. तसेच ईडीकडे सुध्दा काकडे यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे.


हेही वाचा – खुशखबर! यंदा ४ जूनला केरळात मान्सून दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

First Published on: May 26, 2023 6:17 PM
Exit mobile version