Legislative Council Election 2021 : काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Legislative Council Election 2021 : काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. काँग्रेस पक्षातून काँग्रेसच्या हंगामी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोल्हापूर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर धुळे-नंदुरबारमधून गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केले आहेत. मुंबईतून राजसिंह सिंह, कोल्हापूरमधून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारमधून अमरिश पटेल, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-बुलडाणा-वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधून अमल महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महाडिक आणि पाटील यांच्यातील संघर्ष पहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून धुळे-नंदूरबारसाठी गौरव वाणी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विरूद्ध धुळे-नंदूरबारमधून अमरिश पटेल असणार आहेत. त्यामुळे या जागेवर भाजप की काँग्रेस पक्षाचा विजय होणार हे सुद्दा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

येत्या आगामी महिन्यातील १० डिसेंबर रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. तसेच चार दिवसानंतर म्हणजेच १४ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे निवडणूकीमध्ये नक्की काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा: St Workers Strike : एसटी संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव – अॅड. गुणरत्न सदावर्ते


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे त्यांनी गेल्या काही महिन्यापासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच महाविकास आघाडीच्या वतीने आता ते मैदानात उतरले आहेत.

First Published on: November 22, 2021 6:57 PM
Exit mobile version