करोना मृतांची संख्या झाली १९४

करोना मृतांची संख्या झाली १९४

गुरुवारी राज्यात २८६ करोनाबाधित सापडले असून राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३२०२ इतकी झाली आहे. तर सात करोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १९४ झाली आहे. मुंबईत 200 पेक्षा अधिक रुग्ण सापडत असताना गुरुवारी रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी मुंबईमध्ये 107 रुग्ण सापडल्याने दिलासा मिळाला असला तरी 3 जणांचा करोनाने बळी घेतल्याने मृतांचा आकडा 116 वर पोहचला आहे.

राज्यात गुरुवारी झालेल्या सात मृत्युंपैकी मुंबईचे ३ तर पुण्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ५ पुरुष तर २ महिला आहेत. आज झालेल्या ७ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ८६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे.

मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना गुरुवारी मुंबईत फक्त 107 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने दिलासा मिळाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2043 वर पोहचला आहे.

तसेच मुंबईमध्ये 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 116 वर पोहचला आहे. मृत झालेल्या व्यक्तींपैकी 2 जण हे दीर्घकाळ आजारी होते तर एकजण वयोवृद्ध होते. त्याचप्रमाणे बुधवारी 299 कोरोनाचे संशयित रुग्ण सापडले असून बरे झालेल्या 21 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतून तब्बल 202 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६,६७३ नमुन्यांपैकी ५२,७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

First Published on: April 17, 2020 6:33 AM
Exit mobile version