मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; १११८ नवे रुग्ण, तर राज्याची रुग्णसंख्या १८८५ वर

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; १११८ नवे रुग्ण, तर राज्याची रुग्णसंख्या १८८५ वर

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आज राज्यात (Maharashtra) १८८५ रुग्णांचे निदान झाले आहे. तर रायगडमधील (Raigad) एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक नवी रुग्णसंख्या ही मुंबईत (Mumbai) नोंदवण्यात आली आहे. (corona patients increasing Mumbai 1118 new patients and state 1885)

मुंबईत १११८ नवे रुग्ण (Corona patients) सापडले आहेत. तसेच, ठाण्यात १६७ रुग्ण आढळले असून, मुंबई परिसरात नवी १७०३ रुग्णसंख्या आहे. शिवाय, पुण्यात ७४, पिंपरी चिंचवडमध्ये २२ तर नाशिकमध्ये १४ रुग्ण सापडले आहेत.

राज्यात एकूण १७४८० एक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय, मुंबईत बीए ४ चे ३ तर बीए ५ चा एक रुग्ण सापडला आहे. १४ मे ते २४ मे या कालावधीतील हे रुग्ण आहेत. यात दोन ११ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण घरात उपचारादरम्यान बरे झाले आहेत.

हेही वाचा – वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क लावून खेळले सामना, प्रेक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Waddetiwar) यांनी कोरोनाबाबत सध्या घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वेळेवर शाळा सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंतेचे कारण नसल्याचेही वडेटटीवार म्हणाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार हा महिना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णसंख्या अधिक झाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील निर्णय घेतील असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; 24 तासात 8084 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

First Published on: June 13, 2022 7:51 PM
Exit mobile version