दिलासादायक! राज्यात हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर

दिलासादायक! राज्यात हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर

जगासह देशभरात कोरोनाचा कहर हा थांबताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आह. मात्र अशा परिस्थितीत काही दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात सुरूवातीला कोरोनाची १४ धोकादायक हॉटस्पॉट ठिकाणं होती. परंतु या हॉटस्पॉटमधील कोरोना बाधित रूग्णांवर योग्य उपचार झाल्याने या क्षेत्रातील रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे राज्यातील हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आली आहे.

मालेगाव येथे विशेष लक्ष केंद्रित

धोकादायक क्षेत्रांची संख्या कमी झाल्याने आता मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नाशिक ही धोकादायक क्षेत्रे असून सध्या मालेगाव येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासह कोरोना रूग्णांचा मृत्यूदर देखील कमी झाल्याने आशादायी चित्र सध्या राज्यभरात आहे.

देशातील १२ जिल्हे कोरोनामुक्त

२३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून कोरोनाच्या एकाही रुग्णाची भर पडलेली नाही. तसेच जिल्ह्यात गेल्या २८ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने देशातील अशा जिल्ह्यांची संख्या १२वर आली आहे.


राज्याच्या तिजोरीत खडखडाट, ४० हजार कोटींची महसुली तूट!

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला असून त्यांनी असे सांगितले की, ‘कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई किटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी खोली केली जाईल. ज्यात केवळ एक डॉक्टर उभे राहू शकतील. त्या रूममधून केवळ हातबाहेर निघू शकेल आणि ग्लोव्ह्ज घालून रुग्णाची स्वॅब चाचणी घेण्यात येईल. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहेत.’ तसेच संपु्र्ण राज्यातील स्थिती बघता घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. शाळा, महाविद्यालये यांचा वापर करून मुंबईत संस्थात्मक विलगीकरण वाढवण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला यावेळी दिल्या आहेत.

First Published on: April 24, 2020 7:59 AM
Exit mobile version