खासगी कंत्राटी पद्धत रद्द करण्याची हिम्मत दाखवा; फडणवीसांना रघुनाथ कुचिक यांचे आव्हान

खासगी कंत्राटी पद्धत रद्द करण्याची हिम्मत दाखवा; फडणवीसांना रघुनाथ कुचिक यांचे आव्हान

मुंबई : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी पदभरतीचा शासनाआदेश रद्द केला होता. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी अखेर नरमले अशी बोचरी टीका केली होती. आता शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनीही फडणवीसांवर टीका करत खासगी क्षेत्रातील कंत्राटी पद्धत रद्द करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान दिले आहे.(Courage to abolish the private contracting system Raghunath Kuchik challenges Fadnavis)

कुचिक यांनी म्हटले की, कंत्राटी कामगार कुठे असावेत त्याचे काही ठराविक नियम आहेत. तात्पुरत्या कामासाठी कंत्राटी कामगार असावा, यासाठी राज्यात कंत्राटी कामगार निर्मूलन पद्धतीचा कायदा आहे. त्याची समितीच नेमणूक नाही पण, बियरचा खप वाढावा यासाठी तत्काळ समिती गठन होते. केंद्र आणि राज्यात कामगार कायद्यातील बदलले त्यानंतर उत्पादन प्रक्रियेत कायम स्वरूपातील कंपनीचे कामकाज सेवा उद्योगासह कंत्राटी कामगार लावण्याचे फ्याड अलीकडे जोमात आले. गेली 15 ते 20 वर्षांत त्याचे प्रचंड पेव फुटले आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित युवक तरुणांचे भविष्य अंधारात गेले. या कंत्राटीकरण कायद्याचा शोषणास कारणीभूत होत असून, उद्योजकांकरवी सर्रास दुरुपयोग सुरू झाला असल्याचे डॉ. रघुनाथ कुचिक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : PHOTOS : IND VS NZ: मोहम्मद शमीची दमदार एंट्री; भारताकडून धावांचा पाठलाग सुरू

95 टक्के नोकऱ्यांचे कंत्राटीकरण

शासकीय आणि खासगी कार्यालयातील कंत्राटी कामगारांचे ठेके बऱ्यापैकी गुंडांना आणि लोकप्रतिनिधी संबंधितनाच दिले जातात. हे राज्यातील निखळ वास्तव्य आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन 21 हजार पगार मिळाला पाहिजे, पण त्यांच्याकडून आठ दहा हजारावर काम करवून घेतले जाते. यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक शोषण होते. त्याबाबत खासगी उद्योग, शासकीय आस्थापना महापालिकेत आयुक्तच कायदे पाळायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. देशात व राज्यात 95 टक्के टक्के सरकारी व खासगी नोकऱ्याचे कंत्राटीकरण झाले आहे.

हेही वाचा : मुंबईभर धुळीचे प्रदूषण; फवारणीसाठी प्राधान्य ‘पॉश विभागांना’

युवकांच्या रोजगासाठी संघर्ष केला जाईल

यावेळी शासकीय कंत्राटी भरतीचा स्वतः 23 मार्च ला काढलेला जीआर मागे घेतल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांगावा केला. धन्यवाद आभार तर मानलेच पाहिजेत. कंत्राटीकारणाचा रद्दचा असा जीआर त्यांनी राज्यातील सर्व खासगी उद्योगासाठी त्वरित काढून या सरकारने 100 टक्के कंत्राटी पद्धत बंद करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा हा दुजाभाव राज्यातील कंत्राटी रोजगार सहन करनार नाहीत तर यावर युवा कामगारांच्या सुरक्षित रोजगारासाठी लवकर संघर्ष उभा केला जाईल असा इशारा कुचिक यांनी दिला आहे.

First Published on: October 22, 2023 10:15 PM
Exit mobile version