घरICC WC 2023PHOTOS : IND vs NZ: मोहम्मद शमीची दमदार एंट्री; भारताकडून धावांचा पाठलाग...

PHOTOS : IND vs NZ: मोहम्मद शमीची दमदार एंट्री; भारताकडून धावांचा पाठलाग सुरू

Subscribe

वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी सुरू आहे. या स्पर्धेतील हा 21वा सामना आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 273 धावा केल्या. सध्या भारत त्या धावांचा पाठलाग करीत आहे.

- Advertisement -

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीच्या जोडीने 71 धावापर्यंत विकेट दिली नाही. मात्र, 71 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा 40 चेंडूत 46 धावा करून तो बाद झाला. तर  76 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल 31 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.

- Advertisement -

सामना सुरू असताना धर्मशाळेच्या मैदानात बरेच धुके आले. त्यामुळे चेंडू दिसण्यात अडचण येत होती. या कारणास्तव हा खेळ थांबवण्यात आला होता. दरम्यान धर्मशाळेतील धुके कमी झाल्यानंतर आकाश निरभ्र झाले. त्यामुळे पुन्हा खेळ सुरू झाला. यावेळी 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या 117/2 अशी होती.

या विश्वचषकात मोहम्मद शमीला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर क्रिझवर स्थिरावलेल्या रचिन रवींद्रला बाद करत 159 धावांची भागीदारी मोडली. शेवटी त्याने तीन विकेट घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने 10 षटकात 54 धावा देत पाच बळी घेतले.

कुलदीपने पहिल्या पाच षटकात एकही विकेट न घेता 48 धावा दिल्या होत्या. मात्र, नंतर त्याने दडपण निर्माण केले आणि दोन बळीही घेतले. याशिवाय त्याने इतर गोलंदाजांना चांगले सहकार्य केले. त्याच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये त्याने 25 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -