घरमुंबईमुंबईभर धुळीचे प्रदूषण; फवारणीसाठी प्राधान्य 'पॉश विभागांना'

मुंबईभर धुळीचे प्रदूषण; फवारणीसाठी प्राधान्य ‘पॉश विभागांना’

Subscribe

संपूर्ण मुंबईत म्हणजे पूर्व, पश्चिम उपनगर व शहर भागात प्रदूषणाची समस्या मुंबईकरांना भेडसावत असताना पालिकेने प्रथम प्राधान्य शहर भागातील काही महत्वाच्या विभागांना देत त्याच भागात उपाययोजना करण्यात आली.

मुंबई : संपूर्ण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वायू, धुळीचे प्रदूषण मुंबईकरांना भेडसावत आहे. त्यावरून सरकारने झापले आणि सर्व स्तरावरून टीकाटिपणी झाली. त्यामुळे खडबडून जागी झालेल्या पालिका प्रशासनाने घाईगडबडीत बैठका घेऊन उपाययोजनांसाठी हालचाली सुरू केल्या. मात्र रविवारी (22 ऑक्टोबर) सुट्टीच्या दिवशी पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी शहर भागातील वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांसारख्या महत्वाच्या आणि पॉश परिसराला प्रथम प्राधान्यक्रम देत ‘मिस्ट मशीन्स’चा वापर केला.(Dust pollution across Mumbai Preference for spraying posh sections)

संपूर्ण मुंबईत म्हणजे पूर्व, पश्चिम उपनगर व शहर भागात प्रदूषणाची समस्या मुंबईकरांना भेडसावत असताना पालिकेने प्रथम प्राधान्य शहर भागातील काही महत्वाच्या विभागांना देत त्याच भागात उपाययोजना करण्यात आली. त्यामुळे ‘वेदना अंगभर मात्र मलमपट्टी फक्त गुडघ्यावर’ या शब्दांत पालिकेवर टीकाटिपणी होऊ लागली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करायची असेल तर संपूर्ण मुंबईभर समान पद्धतीने करायला पाहिजे, अशी भावना मुंबईकर व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

यामुळे वाढलेय धुळीचे प्रदूषण

मुंबईत सध्या वरळी, परळ, घाटकोपर, दादर, भायखळा, भांडुप, मुलुंड, मालाड, अंधेरी, बोरिवली आदी ठिकाणी एसआरए प्रकल्प, खासगी जागेत इमारत पुनर्विकास, शासकीय, पालिका जागेत इमारत बांधकामे अशी सहा हजार इमारत बांधकामे सुरू आहेत. या इमारतीच्या ठिकाणी इमारत पाडकाम, लादी, टाईल्स कटिंग करणे, डेब्रिजचा ढिगारा उचलणे आदी कारणांमुळेही धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याद्वारेही धुळीचे प्रदूषण होते आणि त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास धूळ उडते आणि या धुळीमुळे प्रदूषण वाढते. तसेच, चेंबूर माहुल परिसरात रिफायनरी आहेत. केमिकल कंपन्या आहेत. मुंबादेवी, काळबादेवी परिसरात सोन्याचे दागिने घडविणारे कारखाने असून कारागीर केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्याचप्रमाणे मुंबईत ठिकठिकाणी पावखारी, बटर बनविणाऱ्या बेकऱ्या असून त्याद्वारेही काळाकुट्ट धूर निर्माण होतो. त्यामुळे प्रदूषणाला काही प्रमाणात हातभार लागतो. त्याचप्रमाणे, मुंबईत वाहनांची वाढती संख्या पाहता पेट्रोल, डिझेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे इंधन जळून त्याद्वारेही वायू प्रदूषणात भर पडत आहे.

हेही वाचा : ड्रग्जचे तार छत्रपती संभाजीनगरपर्यंत! DRI च्या कारवाईत 500 कोटींचे अमली पदार्थ जप्त

- Advertisement -

बांधकामांना रोखण्याचा दिला होता इशारा

या प्रदूषणाबाबत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी 20 ऑक्टोबर रोजी सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच, 23 ऑक्टोबर रोजी आवश्यक ती सर्व मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याबाबत सूतोवाच केले. आयुक्त चहल यांनी मुंबईतील निर्माणाधिन इमारतींच्या ठिकाणी धूळ प्रदूषण रोखण्यासाठी संबंधितांनी (बिल्डर, मालक आदी) 35 फूट उंच पत्र्यांची बंदिस्त भिंत उभारणे बंधनकारक असल्याचे केले आहे. तसेच, संपूर्ण इमारत कपड्याच्या आच्छादनाने बंदिस्त करणे बंधनकारक केले आहे. या सर्व इमारत बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा खासगी असो किंवा शासकीय, अशा बांधकामांना रोखण्यात येईल, असा सक्त इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी दिला आहे.

हेही वाचा : किरकोळ वादानंतर चालकाने बस रिव्हर्स घेत वाहनांना उडवले; सुळें म्हणाल्या- संतोष माने प्रकरणाची…

पालिकेने केला अजब दावा

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले होते. मुंबईतील वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात मिस्ट मशीन्सचा वापर करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -