कोविन ॲप सर्वसामान्यांसाठी नाही तर प्रशासकीय कामासाठी, अशी करा नोेंदणी

कोविन ॲप सर्वसामान्यांसाठी नाही तर प्रशासकीय कामासाठी, अशी करा नोेंदणी

कोविन ॲप सर्वसामान्यांसाठी नाही तर प्रशासकीय कामासाठी, अशी करा नोेंदणी

राज्यात कोरोना लसीकरणाचा तीसरा टप्पा सुरु झाला आहे. तीसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आणि गंभीर प्रकृती असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. राज्यात सर्व प्रशासकीय रुग्णालयांत तीसऱ्या टप्प्यात मोफत लसीकरण केले जात आहे. परंतु लसीकरणासाठी लाभार्त्याला कोविन पोर्टलवर आपले नाव व संबंधित सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे. दरम्यान ज्या कोविन ॲपचा वापर करुन लसीकरण करण्यात आले ते सर्वसामान्यांसाठी नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी कोविन पोर्टलचा वापर करावा लागणार आहे. कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. यासाठी http://cowin.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्पा सुरु झाल्यावर अनेक नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅपचा वापर केला. कोविन अॅपवर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आणि बिगाडामुळे लसीकरण काही काळ रखडले होते. याचा नाहक त्रास लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना झाला. अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. नागरिकांना आलेल्या अडचणींनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे स्पष्टीकरण दिले की, कोविन अॅप हे सर्वसामान्यांसाठी नसून फक्त प्रशासकीय कामांसाठी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे की, कोरोना लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुनच नागरिकांनी नोंदणी करावी. प्लेस्टोरवर उपलब्ध असलेले कोविन अॅप हे प्रशासकीय कामासाठी आहे. जर नागरिकांना कोरोना लसीकरण करायचे असेल तर http://cowin.gov.in या कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

अशा प्रकारे कोविन पोर्टलवर करा नोंदणी

http://cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या
तुमचा मोबाईल नंबर सामायिक करा, यानंतर Get otp या ऑप्शनवर क्लिक करा
एसएमसद्वारे तुम्हाला एक कोड येईल
वेबसाईटवर ओटीपीच्या रकान्यात कोड टाकून verify वर क्लिक करा
ओटीपीची पडताळणी झाल्यावर रिजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशनवर योग्य माहिती सामायिक करा

अशी माहितीचा फॉर्म भरल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या रजिस्टर regisert या बटणावर क्लिक करा. तुमची नोंदी यशस्वी झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. यानंतर लसीकरणासाठीच्या तारखेसाठी अकाऊंट डिटेल्स पेजवर असणाऱ्या कॅलेंडर बटणावर क्लिक करा आणि Schedule Appointment वर क्लिक केल्यास तुम्हाला लसीकरण कधी करायचे आहे. याबाबत तारीख येईल. तुम्हाला पाहिजे त्या केंद्राची आणि वेळेची निवड करुन Book Appointment for Vaccination pageवर क्लिक करा.

कोविन ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे गोंधळ

राज्यात तीसऱ्या टप्प्यात आणि देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली परंतु अनेक जिल्ह्यांत कोविन अॅपमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे गोंधळ उडाला होता. या अडचणींमुळे नागरिकांची नोंदणी होण्यासा वेळ लागत होता. काही ठीकाणी लसीकरणही उशीराने सुरु झाल्या. तात्रिक त्रुटीमुळे दुपारी १२ वाजेपर्यंत कोणालाही कोविन अॅपवर नोंदणी करणे शक्य झाले नाही.

First Published on: March 2, 2021 9:45 AM
Exit mobile version