कन्हैया कुमार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकाराली

कन्हैया कुमार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकाराली

कन्हैया कुमार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकाराली

गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार हा येणार आहे. हा कार्यक्रम कोल्हापुरातील दसरा चौकात होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी बुधवारी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. मात्र, आता परवानगी नाकरली आहे. कन्हैया कुमार यांची दसरा चौकात सभा होणार होती.

गोविंद पानसरे यांचा शनिवारी २० फेब्रुवारीला सहावा स्मृतीदिन आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दोन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कन्हैया कुमार यांची जाहीर सभा होणार होती. त्यासाठी पोलिसांनी बुधवारी या सभेस परवानगी दिली होती. परवानगी देताच गिरीश फोंडे यांनी ही सभा दसरा चौकात उघड्यावर होणार अशी माहिती पत्रकार परिषद घेत दिली. त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सभेला परवानगी नाकारली आहे.

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या सभेचं आयोजन केलं होतं. या सभेचे अध्यक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांची निवड करण्यात आली होती. तर या सभेला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे, JNU मधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक या उपस्थित राहणार होत्या.

 

 

First Published on: February 19, 2021 5:39 PM
Exit mobile version