‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबई-पालघरला धडकणार; NDRF ची पथकं तैनात

‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबई-पालघरला धडकणार; NDRF ची पथकं तैनात

Cyclone Nisarga: रायगडमध्ये पहिला बळी: वीजेचा खांब कोसळून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबई आणि पालघर पर्यंत पोहोचलं असून मुंबई आणि पालघर किनारपट्टीवर धडकणार आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचा प्रभाव मुंबईपासून ६०० किलोमीटरपर्यंत असणार आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासह कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

निर्सग वादाळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफचं पथक सिंधुदुर्ग, पालघर, रायगडमध्ये दाखल झालं आहे. या पथकाने श्रीवर्धनला समुद्राची पाहणी केली. यासह पथकाने सिंधुदुर्ग तारकली समुद्र किनारी पाहणी करुन डहाणू दातीवडे येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.


हेही वाचा – मूडीजने भारताचं रेटिंग केलं कमी; जीडीपी ४ टक्क्यांनी घसरणार


पुढील २४ तासात अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र सध्या गोव्यापासून ३०० कि.मी. अंतरावर आहे.

 

First Published on: June 2, 2020 12:57 PM
Exit mobile version