विरोधी पक्षनेत्यांनी दौऱ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा केला, प्रवीण दरेकरांचा आरोप

विरोधी पक्षनेत्यांनी दौऱ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा केला, प्रवीण दरेकरांचा आरोप

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दिखाऊपणाचा, केवळ तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याचे दरेकरांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी चिपी विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे कशाला प्रयोजन केले मुंबईला मंत्रालयात आढावा बैठक घेता आली असती आणि कोकणातील नुकसानभरपाईची वाट बघणाऱ्या नागरिकांना मदत जाहीर करता आली असती. परंतु केवळ विरोधी पक्षनेत्यांचा ३ दिवसांचा दौरा झाला आणि आपण तिकडे गेलो नाही असे होता कामा नये म्हणुन आशा प्रकारचा देखावा करण्याचे काम या दौऱ्याच्या निमित्ताने झाले आहे. हे कोकणवासियांनी स्पष्ट पाहिले आहे. लोकप्रतिनिधींनी जाऊन दुःख समजून घेतले पाहिजे. दुःख समजून घेतल्यानंतर त्या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात येते यानंतर आढावाच्या आधारे निर्णय घेता येतात.

शिवसेनेला कोकणाने भरपूर दिले

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामानाच्या अग्रलेखात संजय राऊतांनी चुलीचा उल्लेख केला. चुली पेटवणार चुली बघितल्याच नाही तर चुली पेटवणार कुठे, रस्त्यावर, विमानतळावर चुली नसतात. त्यामुळे कर्णी आणि कथनी मध्ये फरकर असतो. कोकणवासियांनी शिवसेनेला भरपूर दिले आहे. अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून कोकणचा सिंहाचा वाटा आहे. परंतु निसर्ग वादळात केलेली मदत आजही पोहोचली आहे. आता पुन्हा ते तौत्के वादळामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. जवळपास पंचनामे सगळे पुर्ण झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे.

एका बाजूला आपण मदत करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने दीड हजार कोटीची मदत करावी, केंद्राने २ हजार कोटी मदत करवी, गुजरातला १ हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला २ हजार कोटी दिले पाहिजेत अशी मागणी महाविकास आघाडीमधील नेतेमंडळी करत आहेत. याचा अर्थ राज्य सरकारला मदतीचा अंदाज आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मदत द्यावी अशी अपेक्षा असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

..तर नवाब मलिक तुम्हाला जनता कोल्हापुरी चप्पल दाखवेल

कोकणावासियांचा पुर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. या उपर कोट्या आणि टीका, टीप्पणी उत्तम करण्यात आली आहे. लोकांना सगळे दिसत आहेत. यावरुन ३ दिवसांचा देवेद्र फडणवीसांचा दौरा मच्छिमारांना भेटणे, बागायतदारांना भेटणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे अशा प्रकारचा तपशीलवार दौरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अशाप्रकारे ७५० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ते आमच्या दौऱ्याविषयी भाष्य नवाब मलिक करणार त्यावेळी बुट घातलेत की सूट घातलेत हे नवाब मलिक आम्हाला सांगणार आम्हाला अधिकार नाहीत. घरात बसायचे ह्यांनी आणि आम्हाला अधिकार सांगयचा यापेक्षे हुशारीची राजकारणाची थट्टा दुसरी असू शकत नाही असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जा जर मदत केली नाही तर कोल्हापुरी चप्पल बुटाच्या ऐवजी नवाब मलिक तुम्हाला दाखवल्याशिवाय कोकणची जनता तुम्हाला राहणार नाही. एवढी कोकणची जंता संतपाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

विरोधी पक्ष फोटोसेशनसाठी आला आहे. वैफल्यग्रस्थ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आम्ही मागील ३ दिवस दौरा केला आहे. वैफल्यग्रस्थही आहोत. परंतु कोकणातील नुकसानग्रस्त जनतेला मदत करा अन्यथा कोकणातील जनता वैफल्यग्रस्थ झाल्यास तुम्हाला पळता भुई थोडी होईल असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. ३ तासाच्या दौऱ्याने जाऊन यायचे आणि हवाई दौरा मी करत नाहीत. स्वतः हवाई मार्गे प्रवास करायचा आणि म्हणायचे मी हवेतून प्रवास करत नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे.

First Published on: May 21, 2021 6:49 PM
Exit mobile version