“सामनात लिहीणारा वेगळा अन नाव दुसर्‍याचेच” दादा भुसे यांचा चिमटा

“सामनात लिहीणारा वेगळा अन नाव दुसर्‍याचेच” दादा भुसे यांचा चिमटा

नाशिक : सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी केलेल्या वक्तव्याबाबत बोलतांना शिंदे गटाचे मंत्री तथा नाशिकचे पालकंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देतांना सामनात लिहीणारा वेगळा आणि नाव दुसरयाचे असे पण असू शकते. त्यामुळे त्यांनी असे का लिहीले हे त्यांनाच विचारले तर बरं होईल असे सांगत दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी तयार केला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल असे मत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.८) जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ना. भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अपात्रेवर आठवड्याभरात निकालाची शक्यता असल्याबाबत भुसे यांना विचारले असता ते म्हणाले, आपला देश घटना व कायद्यावर चालतो. त्यामुळे न्यायालयाचा जो काही निकाल यईल, तो सर्वांना बंधनकारक राहिल, आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे न्यायालय योग्य तो निकाल देईल असा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात खा. पवार यांनी राष्ट्रवादीत नविन नेतृत्व तयार होेऊ दिले नाही. तसेच उत्तराधिकारी ठरवला नसल्याची टीका करण्यात आल्याबद्दल भुसे यांचे लक्ष वेधण्यात आले. माझ्यासारखा छोटा कार्यकर्त्यांने त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. ज्याने अग्रलेख लिहला अथवा ज्याच्या सांगण्यावरून तो लिहला गेला, त्यांनाच विचारा असा टोला भुसे यांनी खा. संजय राऊत यांना लगावला. तसेच खा. पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी तयार केला नाही, हे म्हणणे उचित नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासारखे नेतृत्व पवार यांनी पुढे आणण्याचे भुसे म्हणाले.

First Published on: May 8, 2023 8:10 PM
Exit mobile version