दसरा मेळाव्याला उरले अवघे काही तास, कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने; प्रतिष्ठेच्या लढाईत कोण जिंकणार?

दसरा मेळाव्याला उरले अवघे काही तास, कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने; प्रतिष्ठेच्या लढाईत कोण जिंकणार?

मुंबई – शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा प्रचंड प्रतिष्ठेचा ठरणार आहे. गेल्या काही वर्षांतील प्रथा मोडित काढून यंदा दोन ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाचा बीकेसीतील दसरा मेळावा आणि ठाकरेंचा शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली असून दसरा मेळाव्यासाठी अवघे काही तासच उरले आहेत. त्यामुळे अवघ्या काही तासात कोणाती तोफ अधिक धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पोलिसांकडून दोन्ही मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. तसंच, दोन्ही गटांना विविध नियम लादून दिले आहेत. शिंदे गटाकडून समर्थकांसाठी जेवणाची आणि आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून दोन्ही मेळाव्यासाठी कार्यकर्ते येणार आहेत. त्यासाठी अनेकजण मार्गस्थ झाले आहेत. त्यामुळे कोणाच्या मेळाव्याला अधिक गर्दी होणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे अॅनिमेशन अन् 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन; वाचा कसा असेल मेळावा?

ठाण्यातील प्रशांत कॉर्नर हे मिठाईचे दुकान मिष्ठान्नासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनाच शिंदे गटाकडून अडीच लाखांची फूड पॅकेट्ची ऑर्डर देण्यात आली आहेत. धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ देण्यात येणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक दसरा मेळाव्याकरता येणार आहेत. तसंच, मुंबई शहराच्या आजूबाजूच्या शहरातून हजारो लोक मुंबईत येणार आहेत. बीडमधील ठाकरे गटातील अने निष्ठांवत शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. गेल्या १९ दिवसांपासून हे निष्ठावंत कार्यकर्ते पायी वारी करत मुंबईत येत आहेत. तसंच, महिला शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत.

हेही वाचा – कोणाच्या ‘धनुष्यबाणा’ने रावणाचं होणार दहन

वाहतुकीत बदल

First Published on: October 4, 2022 9:31 PM
Exit mobile version