आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, नवीन पुनर्वसन धोरणावर निर्णय होण्याची शक्यता

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, नवीन पुनर्वसन धोरणावर निर्णय होण्याची शक्यता

मुंबई – शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. सण उत्सवामुळे काही दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नव्हती. आज ही बैठक सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्या मिळण्याची शक्यता आहे.  पूर, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होणे, दरड कोसळणे यासारख्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी राज्याचे नवीन पुनर्वसन धोरण येणार आहे.

ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. गोविंदांना मदतीच्या निर्णयासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

हे निर्णय होण्याची शक्यता –

राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पूर येणे, दरड कोसळणे, चक्रीवादळे, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्र दरवर्षी तोंड देत असते. अशा स्थितीत नागरिकांच्या पुनर्वसनाचे पुनवर्सन धोरण निश्चित करण्यात आले आहे. यामुळे संभाव्य जिवीतहानी मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. राज्याच्या या नव्या पुनर्वसन धोरणामध्ये नवे निकष आणि नियमातील सुधारणा यांचा समावेश असणार आहे. राज्यात एखाद्या जिल्ह्यात आपत्ती ओढवल्यानंतर देण्यात येणारी मदत वितरीत करण्याचे अधिकार नविन पुनर्वसन धोरणात ठरवण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना मदतीची रक्कम देण्यासाठी लागणार विलंबाचा  विचार या नव्या धोरणात केला जाणार आहे. हे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना केली होती.

First Published on: September 12, 2022 9:22 AM
Exit mobile version