चित्रा वाघ यांनी राठोडांवरील आरोपांचा पाठपुरावा करावा, दीपक केसरकरांचं आव्हान

चित्रा वाघ यांनी राठोडांवरील आरोपांचा पाठपुरावा करावा, दीपक केसरकरांचं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना या कार्यक्राचे व्हॉट्सअॅपवर आमंत्रण मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. तर विरोधकांनी उद्घाटनाचा राजकीय डावपेच खेळला आहे, असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चौकशी सुरू असतानाही त्यांना मंत्रिपद दिल्याने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हल्लाबोल केला होता. त्यावरून दीपक केसरकर यांनी त्यांना खुलं आव्हान केलं आहे. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा पाठपुरावा करावा, जर ते दोषी आढळले तर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं दीपक केसरकर म्हणाले. त्यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेत संवाद साधला. (Deepak kesarkar challenges to chitra wagh on sanjay rathod case)

आज मी दौऱ्यावर जाणार असून सर्वप्रथम पुण्याला जाणार आहे. नंतर कोल्हापूरला जाणार आहे. जयपूरप्रमाणे महाराष्ट्रमधील हेरिटेज समोर कसं आणता येईल याकडे लक्ष देणार आहे. तसेच, त्यानंतर सातारा, कोल्हापूर मतदारसंघात जाणार. दौरा संपवल्यावर अधिवेशनात उपस्थित राहणार, असंही दीपक केसरकर यावेळी बोलले.

आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तरीही कोणाला कोणते खाते मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे खातेवाटप कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, खातेवाटप करणं मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यावर आम्हाला कार्यालये देण्यात आली आहेत खातेवाटप मुख्यमंत्री लवकरच करतील, असं दीपक केसरकर म्हणाले.

मी उद्धव ठाकरेंवर कधीच टीका केला नाही. मात्र, अनेक माध्यमं चुकीचे हेडींग चालवतात. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करतोय असं वाटतं. मात्र, मी मुद्द्यावर बोलतो. व्यक्तीवर बोलत नाही. उद्धव ठाकरे मोठे आहेत, असंही ते म्हणाले.

मी त्यांना लहानाचे मोठे होताना पाहिले नाही पण 6 वर्ष त्यांच्या साठी काम करत होतो तेव्हा त्यांच्यावर टीका करणाऱ्यावर आम्ही बोलत होतो पण ते आता विसरले असावेत आम्ही विसरू शकत नाही.

 

First Published on: August 11, 2022 3:54 PM
Exit mobile version