“समृद्धी महामार्गावरून माझे नाव मिटवता येणार नाही”, श्रेयवादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“समृद्धी महामार्गावरून माझे नाव मिटवता येणार नाही”, श्रेयवादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गवरून माझं मिटवता येणार नाही; श्रेयवादावर फडणवीसांची प्रतिक्रिया

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरपर्यंत काम जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या बुलढाणा आणि वाशिम येथील कान सुरु असून मे अखेर पर्यंत हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा महामार्ग सुरु होण्यापूर्वी आता शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. याच श्रेयवादाच्या लढाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्ग कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझे नाव त्यावरून मिटवता येणार नाही, असे विधान फडणवीस यांनी केलं आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

समृद्धी महामार्गाच्या शिवसेनेच्या श्रेयवादावर बोलताना फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझे नाव त्यावरून मिटवता येणार नाही. ते माझे श्रेय नाही, जनतेने त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पदाची संधी दिली, ही संकल्पना 20 वर्षे माझ्या डोक्यात होती, की अशाप्रकारचा रस्ता झाला पाहिजे. त्यावेळी आम्ही करू शकलो. समृद्धी महामार्गाचा विरोध करणारे ते लोकं देखील या रस्त्याच्या उद्धाटनाचा प्रयत्न करत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. असा टोला फडणवीसांनी शिवसेना लगावला आहे.

“समृद्धी महामार्ग सुरु झाला पाहिजे त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे, केवळ एवढं वाटतं की त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत, ती कामं पूर्ण करूनचं त्याचं उद्धाटन केलं तर चांगल होईल. घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं तर रस्ता सुरु होऊ शकेल पण त्या रस्त्याचे असलेले महत्त्व कमी होईल, त्यामुळे कामं पूर्ण करूनचं समृद्धी महामार्गाचे उद्धाटने करावे, पण कधीही उद्धाटन झाले तरी त्याचे मी स्वागत करेन. ”असं देखील फडणवीस म्हणाले.


देशात भाजपशासित राज्यात अजूनही भोंगे उतरले नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

First Published on: April 5, 2022 12:11 PM
Exit mobile version