घरताज्या घडामोडीदेशात भाजपशासित राज्यात अजूनही भोंगे उतरले नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

देशात भाजपशासित राज्यात अजूनही भोंगे उतरले नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Subscribe

मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशात भाजपचे सरकार असलेल्या अनेक राज्यात हायकोर्टाचे आदेश असताना भोंगे उतरले नाही. गोव्यात भाजपचे १० वर्ष राज्य आहे तिकडे अजूनही भोंगे आहेत. असे संजय राऊत म्हणाले आहेत. भोंग्यांविरोधात भाजपच्या भूमिकेवर राऊतांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी भोंग्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी भाजपची दुटप्पी भूमिका समोर आणली आहे. राऊत म्हणाले, देशामध्ये अनेक राज्यात भोंगे उतरले नाहीत. हायकोर्टाचे आदेश असूनसुद्धा भाजपशासित अनेक राज्यात भोंगे उतरले नाहीत. मधल्या काळात मी गोव्यात होतो तेव्हा अनेकदा अजान ऐकत होतो. तिथे गेल्या १० वर्षांपासून भाजपचे राज्य आहे. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो तिकडेही अनेक ठिकाणी भोंगे आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलयांनी भोग्यांसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्याचे पालन होणे गरजेचे आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनतेनं सावध राहावं

आपल्या खर्चातून भाजप भोंगे उतरवण्यासाठी आणि हनुमान चालीसासाठी भोंगे देणार आहे. असा प्रश्न राऊतांना केला असता ते म्हणाले असं आहे की, चंद्रकांत पाटील यांना कळलं भाजपकडून आपल्या खर्चाने हे सगळं सुरु आहे. तर त्यांच्यामागे ईडी लावतील. जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या मागे लावली होती. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी पैसे जपून खर्च केले पाहिजेत. तुम्ही भाजीची जुडी विकत घेतली तरी भाजपचे तुमच्यावर लक्ष आहे. चिकनच्या दुकानात गेला आणि काल किती किलो घेतले आज किती किलो घेताय याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. ते ईडीला कळवतील त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहिले पाहिजे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्याची भाजपची मागणी

राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे उतरवण्यात यावेत अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी यासाठी कोर्टातही धाव घेतली आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा आवाज उठवल्यामुळे मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भोंग्यांवरुन राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरु असताना राऊतांनी भाजपशासित राज्यांतील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मशीद, मुस्लिम अशा गोष्टी आव्हाडांनी ऐकल्यावर त्यांच्या अंगात…, मनसेकडून जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -