नवं संसद भवन देशाची ताकद, मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढलायं : देवेंद्र फडणवीस

नवं संसद भवन देशाची ताकद, मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढलायं : देवेंद्र फडणवीस

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः नवीन संसद भवन ही देशाची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा ज्वर चढला आहे. त्यामुळे नवीन संसद भवनच्या उद्घाटनाला विरोध होतो आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

आम्ही नवीन संसद भवन बांधू, अशी ओरड सर्वचजण करत होते. कोणालाही नवीन घर बांधता आलं नाही. मोदींनी ते करुन दाखलवं. जे लोक लोकशाहीला मानत नाही, ते लोकशाहीवर बोलत आहेत. सापनाथ, नागनाथ सब साथ आओ, अशी त्यांची अवस्था झाली आहे. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. तशी म्हण आहे. नाहीतर तुम्हा म्हणाल मी जाणीवपूर्वक कोणाला तरी बोलत आहे, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

लोकशाहीत कावीळ झाल्यासारख वागण अत्यंच चुकीचं आहे. नवीन संसद भवन ही देशाची शान आहे. देशाची ताकद आहे. भव्य अशा या इमारतीमुळे भारताची ताकद जगासमोर आली आहे. नवीन संसद भवनाच्या इमारतीला विरोध करण्याची जी कारणं सांगितली जात आहेत ती हास्यास्पद आहेत. इंदिरा गांधी यांनी १९७५ साली पंतप्रधान असताना संसदेच्या एनेक्स इमारतीचे उद्घाटन केलं होतं. त्यानंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना सेंट्रल लायब्ररीचं उद्घाटन केलं होतं. मग ती कृती लोकशाही विरोधी होती का, असा सवाल फडणवीस यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी अगदी कमी वेळात भव्य अशी इमारत उभी केली. त्यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. असा टोलाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या योजनांची माहिती दिली. शेती कर्ज हे अल्पवधीसाठी असतं. त्यासाठी सिबिल स्कोर तपासण्याची आवश्यकता नाही. तरी बॅंका शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असतात. म्हणूनच मी त्रास देणाऱ्या बॅंकांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पण बॅंकांचे प्रमुख मला भेटले त्यांनी विनंती केली की अशाप्रकारे कठोर भूमिका घेऊ नका. आम्ही सर्वांना फर्मान जारी करु.  मी त्यांना सांगितलं आहे की जर बॅंकांनी त्रास दिला तर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

 

First Published on: May 24, 2023 5:56 PM
Exit mobile version