बच्चू कडूंचं तर कळलं, पण फडणवीसांनी आणखी ६ आमदारांना केले होते फोन?

बच्चू कडूंचं तर कळलं, पण फडणवीसांनी आणखी ६ आमदारांना केले होते फोन?

बच्चू कडूंचं तर कळलं, पण फडणवीसांनी आणखी ४ मंत्र्यांना केले होते फोन?

राज्यात महाविकास आघाडीचा कारभार सुरळीत सुरु असताना सरकारमधीलच तत्कालीन नगरविकास मंत्री, शिवसेना नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. सुरुवातीला २० ते २८ आमदारांनी बंड केले. पंरतु नंतर आमदारांची संख्या वाढत गेली या आमदारांनी ५० कोटी घेतले असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून सुरु आहे. परंतु एकाही आमदाराने याबद्दल ठाम उत्तर दिले नाही. मात्र आता आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे पुन्हा ५० खोक्यांनी डोकं वर केलं आहे. हा वाद मिटवताना फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना वेगळं वळण लागलं आहे. बच्चू कडू माझ्याच फोननंतर गुवाहाटीला गेले असं फडणवीस म्हणाले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामागे कोणती मोठी महाशक्ती होती हे स्पष्ट झाले असले तरी आणखी काही आमदारांनासुद्धा फडणवीसांनी फोन केला होता अशी चर्चा सुरु आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सत्तेत आल्यापासून ५० खोक्यांवरुन डिवचण्यात येत आहे. शिंदे गटातील आमदारांनी ५० खोके घेतले असल्याचा आरोप आहे. या आरोपांवरुन शिंदे गटात नाराजीचा सूर उमटायला लागला आहे. विरोधकांची टीका सुरु असताना आता सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्येच ५० खोक्यांवरुन वाद सुरु झालाय. या वादावर पडदा पडला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा जुन्या जखमवेरची खपली काढले. बच्चू कडू माझ्या फोननंतर शिंदे गटात गेले असल्याचे फडणवीस म्हणाले यामुळे शिंदेंना फडणवीस आणि भाजपची साथ होती हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

फडणवीसांच्या फोनमुळे आमदार शिंदे गटात

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप सत्ता पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नशील होती. परंतु मध्यंतरी ते प्रयत्न थांबवले असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले असले तरी पडद्यामागून तयारी कायम ठेवण्यात आली होती. जून २०२२ मध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन प्रयत्नांना सत्यात उतरवण्याचा घाट घातला. शिंदे ज्या आमदारांना घेऊन जाऊ शकले नाही त्या आमदारांना फडणवीसांनी फोन केले. यामध्ये बच्चू कडू यांना फोन केला असल्याची फडणवीसांनी कबुली दिली आहे. परंतु आणखी सहा आमदारांनासुद्धा त्यांनी फोन केला होता अशी चर्चा आहे. यामध्ये राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. तर आमदार गीता जैन, आमदार किशोर जोरगेवार, आमदार तानाजी सावंत यांनासुद्धा फडणवीसांनी फोन केला असल्याची चर्चा सुरु आहे.

फडणवीस नक्की काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणांच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की, ‘बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना मी म्हटलं की, आपल्याला सरकार बनवायचं आहे. आमची इच्छा आहे की, आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेले पाहिजे. माझ्या एका फोन कॉलवर बच्चू कडू गुवाहटीला पोहोचले. त्यामुळे बच्चू यांनी कुणाशी सौदा केला, खोके घेतले, असं म्हणणं चुकीचे आहे. बाकी इतरांबाबत मी बोलत नाही’ असे वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.

शिंदे गटाच्या मागील महाशक्ती भाजपच

गुवाहाटीला गेल्यानंतर बंडखोर आमदारांचे सातत्याने फोटो आणि व्हिडीओ समोर येत होते. यावेळी ५० आमदारांना संबोधित करताना एकनाथ शिंदेंनी महाशक्तीचा उल्लेख केला होता. घाबरु नका आपल्या मागे महाशक्ती आहे. असे वक्तव्य शिंदेंनी केलं होतं. यावरुन भाजपवर आरोप करण्यात आला होता परंतु फडणवीसांच्या वक्तव्यामुळे महाशक्ती भाजपच असल्याचे समोर आलं आहे. तसेच गुवाहाटीला फडणवीस आणि शिंदे यांच्या मध्यरात्री बैठका होत होत्या अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली आहे. तसेच आता फडणवीसांनी बच्चू कडू माझ्या बोलण्यामुळे गेले अशी प्रांजळ कबुली दिली असल्यामुळे शिंदे गटाच्या मागील महाशक्ती दुसरी तिसरी कोणीच नसून भाजपच असल्याचे स्पष्ट झालं आहे.


हेही वाचा : माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले; फडणवीसांनी केला मोठा खुलासा

First Published on: October 31, 2022 8:45 PM
Exit mobile version